योग व प्राणायाम शिबीर“Sound mind in Sound Body” असं म्हटलं जातं. आरोग्य हा जीवनाचा पाया आहे. हे ध्यानी घेऊन आधार फौंडेशन विविध ठिकाणी “योग व प्राणायाम” शिबिराचे आयोजन केले जाते. योगशिक्षक सुखदेव इल्हे व निवृत्ती शिर्के यांचे मागदर्शनातून शालेय विद्यार्थी व नागरिकांसाठी योग शिबिराचे आयोजन केले जाते.आधारच्या माध्यमातून तळेगाव दिघे,घुलेवाडी,कळसकर वसतिगृह संगमनेर अशा विविध ठिकाणी योग शिबिराचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.