शालेय साहित्य वाटपदरवर्षी शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरु झाल्यानंतर आधार फाउंडेशन तर्फे “शालेय साहित्य व दप्तर वाटप” केले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी किमान १०० शाळांमधील गरजू व होतकरू मुलांना शालेय साहित्याचे वाटप केले जाते. आधार फौंडेशनचे शेकडो शिलेदार शहर-खेड्यापाड्यात काम करतात, ते शिक्षणापासून वंचित मुलांचा शोध घेणे,व सदर उपेक्षित व गरजू विद्यार्ध्याना शिक्षणासाठी बळ देण्याचे काम करतात. शैक्षणिक वर्षाच्या आरंभी विविध शाळांमधून गरजू मुलांना शालेय साहित्य- वह्या,कंपास,पेन पेन्सिल,चित्र वही,रंग,दप्तर आदि साहित्य तसेच गणवेशाचे वाटप आधारमार्फत करण्यात येते. दरवर्षी आधारच्या १०० दत्तक मुलांनाही या आवश्यक साहित्याबरोबर इतर सहल,पुस्तके,शूज आदींचे वाटप होते. दप्तर व शालेय साहित्य हाती पडताच विद्यर्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागतो.