मानवता अंक२००७ सालापासून आधार फाउंडेशनचे समाजातील उपेक्षित घटकांसाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. समाजात राहावे, समाजधर्म जपला जावा व आपण समाजाचे देणे लागावे अशी समाज परिवर्तनाची दिशा ठरवत आधारने सामाजिक बांधिलकी जपत “दगडातील देव शोधण्यापेक्षा माणसातील देव” शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आधारने केलेल्या या सर्व कार्यास अक्षर लेणं प्राप्त व्हावं,आजपर्यंतचा सेवाप्रवास शब्दांकित व्हावा तसेच आधारच्या कार्याचे जन-माणसांना ओझरते दर्शन घडावे,या उद्देशाने आधार फाउंडेशन मार्फत “मानवता” या अंकाचे प्रकाशन संगमनेरच्या नगराध्यक्ष मा. दुर्गाताई तांबे यांचे शुभहस्ते करण्यात आले.