महारक्तदान शिबिर“रक्तदान हेच जीवनदान” असं म्हटलं जातं. कारण रक्तदानाने अनेक रुग्णांचे प्राण वाचले जातात. रक्ताचे मोल अनण्य साधारण आहे.रक्तदानातून निर्माण होणारी नाती ही खरी “रक्ताची नाती” असतात. २५ डिसेंबर हा कै. धीरज महादेव अरगडेचा स्मृतीदिन . या स्मृतिदिना- निमित्त डॉ. अरगडे यांनी २००८ सालापासून “महारक्तदान शिबिराचा एक समाजोपयोगी उपक्रम सुरु केला. स्मृतीदिन म्हटले की, अनेकजण धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात.परंतु डॉ अरगडे यांनी आपल्या लाडक्या मुलाच्या स्मृतिदिनानिमित्त असे रक्तदान शिबीर घेणे म्हणजे एक क्रांतिकारी पाउलच होय. शामधीरज सेवाभावी संस्था,युनिटी हॉस्पिटल,आधार फाउंडेशन व इतर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून दरवर्षी डिसेंबर महिन्यात हे शिबीर घेतले जाते.दरवर्षी १२५ ते १५० रक्त पिशव्यांचे संकलन होऊन अनेक गरजू रुग्णांना वर्षभर या शिबिराच्या माध्यमातून लाभ देता येतो. असा हा एक समाजउपयोगी उपक्रम !