आपद्ग्रस्तांना आधारकधी-कधी परिसरात काही कुटुंबांवर आपत्ती कोसळते.एखाद्या गरीब व्यक्तीच्या झोपडीला चुलीतील ठिणगीने अथवा दिव्यामुळे अचानक आग लागते व सर्व झोपडी जळून खाक होते, सगळा संसार जाळून जातो. अशावेळी या उघड्या पडलेल्या माणसाला जगण्याचं बळ मिळाव या हेतूने आधार परिवार धाऊन जातो. माणुसकीच्या नात्यातून संवेदनशीलता जागृत ठेऊन आधारतर्फे अशा ठिकाणी किराणा,कपडे,भांडी-कुंडी तसेच धान्याचा कट्टा आदि साहित्य दिले जाते.जळीतप्रसंगी आधारतर्फे मदतीचा हात दिला जातो. आधारची ही मदत फार मोठी नसली तरी संध्याकाळची चूल पेटली जावी, त्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत त्याच दु:ख हलक करण्याच काम आधार करते. समनापूर,नान्नज दुमाला, पारेगाव खुर्द,तळेगाव दिघे,कोळवाडा, पिंपरणे,घुलेवाडी, जांबूत,ओझर (अकोले) आदि ठिकाणी घडलेल्या आपत्तीप्रसंगी आधारने मायेचा हात दिला आहे.