सहभागी व्हा

कुणाला शिकायचं आहे.. कुणाला चालायचं आहे.. कुणाला धावायचं आहे..
आणि कुणाला दु:खास सामोरे जायचेय..
कुणी रुग्ण, तर कोणी मनोरुग्ण आहे...
कुणी निराधार, कुणी अनाथ तर कोणी दुर्बल आहे...

इथं हवा आहे आधार ...
इथं हवं आहे जगण्याचं बळ..
लढण्याची प्रेरणा अन मानसिक बळ..

ज्यासाठी तत्पर आहे संगमनेर मधील सामाजिक बांधिलकी जपणारे ' आधार फाउंडेशन '.
येथे प्रत्येकजण महिन्याला देतो १० रुपयांचे योगदान..
अर्थात वर्षाचे रु. १२०.
यातून तयार होते एकीचे बळ आणि उर्जेचा स्रोत..!

२००७ सालापासून हजारोपेक्षा अधिक गरजूंपर्यंत आधार फाउंडेशन पोहोचले आहे. संगमनेरच नव्हे तर मुंबई,ठाणे,नाशिक,पुणे आदि महानगरातील सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं आधारला जोडली आहेत. आपणही खारीचा वाटा उचलून सहभागी होऊ शकता.

बँक : इंडियन ओवरसीज बँक, संगमनेर
खात्याचे नाव: आधार फाउंडेशन, संगमनेर
खाते नं: १९७०० १०००० ०६०६०
IFS Code: IOBA0001970
TAN : PNEA17871A
Email : adhar.foundation@rediffmail.com
Website: www.adharfoundation.in