आधार दत्तक पालक योजनानिराधार व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या पाल्यांना शिक्षणाचं दालन खुलं करणारी “आधार दत्तक पालक योजना” अतिशय प्रभावी ठरली आहे. आजपर्यंत आधार फौंडेशनने सदर योजनेच्या माध्यमातून ३०० पेक्षा जास्त मुलांना या योजनेचा लाभ मिळून दिला आहे, त्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन,त्यांचे शिक्षणातील अडथळे दूर केले आहेत.वाडी,वस्ती,पाल.अथवा झोपडपट्टीतील निराधार व होतकरू पाल्यांना शिक्षणासाठी बळ मिळावे,कुणाचे शिक्षण अर्ध्यावर राहू नये यासाठी “आधार दत्तक पालक योजना” “मैलाचा दगड” ठरली आहे. या योजनेत कुणाचे पालक आजाराने त्रस्त असतील, कुणाची आई धुणी-भांडी करत असेल,कुणाचे पालक वीट भट्टीवर राबणारे आहेत, तर कुणाचे आईचे, तर कुणाचे वडिलांचे छत्र हरवले आहे, तर कुणाला कुठलेच नातेवाईक नाहीत.या अशा प्रतिकूल ठिकाणी आधार फौंडेशनची मदत पोहचली आहे.पण सर्वच ठिकाणी पोहचण्यासाठी अनेक सेवाभावी हातांची गरज आहे,आपल्या घासातील घास दुसऱ्याला देणे ही तर आपण आपली संस्कृती मानतो,मानवतेचे काम मानतो. बस्स तसाच थोडासा प्रयत्न आधार करत आहे. या सेवाभावी योजनेसाठी मुंबई, नाशिक, पुणे सह महाराष्ट्रातून अनेक सेवाभावी हात पुढे येत आहेत व स्वत:हून निराधार मुलांचे पालकत्व स्वीकारत आहेत.