About“मानव सेवा हीच ईश्वरसेवा” हा संतानी सांगितलेले मंत्र जोपासत संगमनेरमधील सामाजिक भावनेनी काम करणारी सेवाभावी संस्था म्हंजी “आधार फाउंडेशन” होय. सामाजिक बांधिलकी जपली जावी, निराधार तसेच उपेक्षितांच्या आयुष्यात “आशेचा किरण” निर्माण व्हावा या उद्देशाने १५ मे २००७ रोजी आधार फाउंडेशनची स्थापना झाली. आधार फाउंडेशनचे आजपर्यंत ६०० पेक्षा अधिक सभासद झालेले आहेत, महाराष्ट्रातील नाशिक,पुणे,मुंबई,सिंधुदुर्ग,सातारा, आदि विविध जिल्ह्यातील व्यक्तींनी आधारचे सदस्यत्व स्वीकारले आहे. आधारच्या माध्यमातून जाती-धर्माचा विचार न करता मानवी कल्याणाची, विवेकाची, संत गाडगे बाबा,संत तुकाराम आदि संतांच्या विचाराची वाटचाल चालू आहे. खरं तर असलेलं मनुष्यत्व स्वीकारत,व नसलेलं देवत्व नाकारत आधार परिवार समाजहिताचे व उपेक्षितांसाठी नेतृत्व करत आहे. वंचित,उपेक्षित,निराधार, पददलित,तसेच कुणा मनोरुग्णाच्या जीवनात चैतन्याची पहाट निर्माण व्हावी यासाठी आधार परिवार सतत प्रयत्नशील आहे.