Welcome to Adhar Foundation


आधार फाउंडेशन, संगमनेर

प्रेमाचा शब्द, स्नेहाचा स्पर्श ... आपुलकीची नजर, कौतुकाची थाप खळखळून हास्य आणि मदतीचा हात ...! या छोट्याशा गोष्टी आपल्या बरोबरच इतरांचे आयुष्य बदलून टाकतात... एका छोट्याशा आधाराने..!

१० रुपयांची किमया

कुणाला शिकायचं आहे.. कुणाला चालायचं आहे.. कुणाला धावायचं आहे.. त्यांना आधारासाठी तत्पर आहे सामाजिक बांधिलकी जपणारे आधार फाउंडेशन. येथे प्रत्येकजण महिन्याला देतो १० रुपयांचे योगदान.. यातून तयार होते एकीचे बळ आणि उर्जेचा स्रोत..!

लाभलं भरारी घेण्याचं बळ

'आधार' ने अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला. गरीब, दुबळ्या व अनाथांच्या बाळगोपाळांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून त्यांना भविष्याची स्वप्न दाखविण्याचा प्रामाणिक प्रयत्न आधारनं केला.

स्वप्ने निघाली सुसाट

२००७ सालापासून हजारोपेक्षा अधिक गरजूंपर्यंत आधार फाउंडेशन पोहोचले आहे. संगमनेरच नव्हे तर मुंबई,ठाणे,नाशिक,पुणे आदि महानगरातील सामाजिक बांधिलकी जपणारी माणसं आधारला जोडली आहेत. आपणही खारीचा वाटा उचलून सहभागी होऊ शकता.

आधार फाउंडेशन, संगमनेर ची छोटीशी ओळख
Documentry मधून !


निराधारांची सावली व अनाथांची माऊली असणाऱ्या आधार परिवाराचं रोपटं आता वटवृक्षात रुपांतरीत झालंय..!We offer hope for childs, You can help!


माणसाला माणूस जोडला जावा. माणूसपण जपले जावे, माणसाचे माणुसकीचे व हृदयाचे नाते निर्माण व्हावे.
या आंतरिक ओढीने आधार परिवार सतत चिंतनशील व कृतीशील असतो.